
दारूखाना रे रोडमध्ये नागरी समस्यांचा बोजवारा उडाल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे या ठिकाणच्या समस्या तातडीने सोडवा अशी मागणी शिवसेनेने मुंबई पोर्ट ट्रस्टकडे केली आहे. याबाबत आज भायखळ्याचे आमदार मनोज जामसुतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष अंगमुथु यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
दारूखाना रे रोडमध्ये नादुरुस्त रस्ते, गटार लाईन, कचरा व पाणी यासारख्या समस्यांच्या सामना रहिवाशांना करावा लागत आहे. या समस्यांबाबत वारंवार पाठपुरावा करूनही कार्यवाही केली जात नाही. परिणामी नागरिकांना मनस्ताप होत आहे. या बाबी आमदार जामसुतकर यांनी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या निदर्शनास आणून दिल्या. समास्यांबाबत मुंबई पोर्ट ट्रस्टला निवेदनही देण्यात आले. यावर सर्व प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात येतील, असे आश्वासन मुंबई पोर्ट ट्रस्टकडून शिवसेनेला देण्यात आले.
यावेळी भायखळा विधानसभा संघटक मंगेश बनसोड, उपविभाग प्रमुख राम सावंत, शाखाप्रमुख निंगाप्पा चलवादी, दारूखाना आर्यन व स्टील मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष भरत कानकिया, सेव्रेटरी सतीश शॉ, उपाध्यक्ष प्रदीप सुरेका, जॉइंट सेव्रेटरी सुनील शहा, कमिटी मेंम्बर दिनेश अजमेरा, सचिव प्रसाद पाध्ये यांच्यासह मुंबई टिम्बर व प्लाइवुड मर्चंट असोसिएशनचे राकेश देसाई, केतन शहा, अशफाक पाटनवाला, हितेश गाला, परेश शहा, झुबेर पाटनवाला आदी उपस्थित होते.



























































