
सामना प्रतिनिधी । कन्नड
शिवसेना कधीही जातीपातीचे राजकारण करीत नाही. शिवसेनेत कर्तृत्व बघून संधी मिळते. माझ्यासोबत सर्वसामान्य जनता आहे. नेते येतात आणि जातात शिवसैनिकाचे स्थान अढळ आहे. मी धार्मिक कार्यासोबतच सामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचे व वैयक्तिक कामे करणारा कट्टर हिंदुत्ववादी शिवसैनिक आहे, असे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी कन्नड शहरातील जैन मंगल कार्यालयात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळाव्यात बोलतांना सांगितले.
मी सोलापूर-धुळे महामार्गाचा निधी मंजूर करून आणला व कामसुद्धा चालू झाले. संभाजीनगर ते तेलवाडी हा चौपदरी रस्ता एक वर्षात पूर्ण होईल. देभेगाव येथील गुरूद्वारासाठी मोठा निधी दिला. आज देशभरातून शीख बांधव या ठिकाणी दर्शनासाठी येतात. या निधीमुळे हे गाव देशाच्या नकाशावर आले. या धार्मिक स्थळामुळेच बोरगाव ते देवगाव या रस्त्यासाठी निधी मंजूर करून आणला असून, हे काम लवकरच सुरू होईल. वैजापूर ते शिवूर बंगला, चापानेर, कन्नड, पिशोर, सिल्लोड असा मार्ग मंजूर करून आणला असून ते कामसुद्धा लवकरच सुरू होईल. आडगाव पिशोर हे गाव मी दत्तक घेतले असून, त्या गावासाठी मी माझ्या निधीतून अडीच कोटी रुपये खर्च केले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा व विधानसभेवर भगवा फडकवा व आपल्या भागाचा विकास घडवा असे आवाहन त्यांनी केले. मी विकासकामे, शेतकऱ्यांचे प्रश्न, सर्वसामान्य, दवाखाना, सामाजिक व धार्मिक कार्य यांना सढळ हाताने मदत करतो. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणावर सामूहिक विवाह सोहळा आयोजित गोरगरिबांच्या मुलींचे लग्न लावून त्या सोहळ्याचा संपूर्ण खर्च मी उचलतो.
जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी म्हणाले की, शिवसैनिकांच्या ताकदीवर कन्नड तालुका शिवसेनेचा बालेकिल्ला असून, येत्या विधानसभा निवडणुकीत दीड लाख मताधिक्य मिळवून देऊ व त्याचबरोबर शिवसैनिकाला तिकीट देऊन निवडून आणू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख राजू राठोड, अवचित वळवळे, वैजापूरचे माजी नगराध्यक्ष साबीर शेख, सोयगावचे तालुकाप्रमुख दिलीप मचे, तालुकप्रमुख केतन काजे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व तालुका संघटक डॉ अण्णा शिंदे, उदयसिंग राजपूत, ज्येष्ठ शिवसैनिक मारुती काका राठोड, महिला आघाडीच्या तालुका संघटक हर्षली मुठ्ठे, ज्येष्ठ शिवसैनिक विश्वनाथ त्रिभुवन यांच्यासह उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख यांनी मनोगत व्यक्त करून खासदार चंद्रकांत खैरे यांना तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर मताधिक्य मिळवून देऊ, अशी ग्वाही दिली.
यावेळी महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख कला ओझा, सहसंपर्कप्रमुख सुनीता आऊलवार, जिल्हा संघटक रंजना कुलकर्णी, उपजिल्हा संघटक अनिता शिंदे, सुनीता देव, उपशहर संघटक राजश्री राणा, अरुणा भाटी, सविता निगुळे, मंजू नागरे, राजश्री पोफळे, स्मिता जोशी, सुषमा यादगिरे, सोनल पाटणी, शहर संघटक उज्ज्वला बिरारीस, मीना राठोड, उपतालुकप्रमुख शिवाजी थेटे, राजू राठोड, संजय मोटे, दिलीप मुठ्ठे, विठ्ठल मनगटे, संजय राजपूत, उपतालुकाप्रमुख राम पवार, शहरप्रमुख सुनील पवार, तालुका युवाधिकारी उमेश मोकासे, उपतालुका युवा अधिकारी राहुल वळवळे, सुदाम शिंदे, गटनेता, युवासेनेचे शहर अधिकारी बंटी सुरे, माजी नगराध्यक्ष डॉ. सदाशिव पाटील, माजी उपसभापती अशोक दापके, माजी तालुकाप्रमुख सुगंधराव चव्हाण, सुदाम राठोड, व्यापारी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रकाश भारुका, वासडीचे सरपंच राहुल पाटणी, ज्येष्ठ शिवसैनिक गोपाल राजपूत, श्यामराव राठोड, तात्याराव साबळे, माजी उपसभापती गीताराम पवार, विभागप्रमुख संजय पिंपळे, दीपक सोन्ने, गोकुळ डहाके, माधव जाधव, अतिक बॉण्ड, किशोर सोनवणे, दिनकर परसे, सुनील सोनवणे, विजय बारगळ, बाबुराव सोनवणे, बापू बचाटे, ज्ञानेश्वर बोरसे, काकासाहेब काळे, रमेश वारे, माजी जि. प. सदस्य माधवराव जाधव, नंदू बोडखे, हिरालाल राजपूत, बाळासाहेब राजगुरू, विश्वास मनगटे, कारभारी पवार, राजेंद्र गाडेकर, ज्ञानेश्वर वेताळ, रामभाऊ शिंदे, के.एम. गायकवाड, सुनील चंद्रहास, वीरेंद्र खंबाट, गोरख आरते, विलास पाटणी, ज्ञानेश्वर वाढेकर, अभयसिंह गायकवाड, संदिप आढाव, विकास कारभारी, दीपक महाजन, साहेबराव पवार, भगवान राजपूत, रमेश पाटील, रमेश वाणी, दामू मुठ्ठे, भाऊसाहेब राठोड, एस. टी. कामगार सेनेचे गायकवाड, कन्नड आगाराच्या शाखाप्रमुख मथुरा चव्हाण, उपशहरप्रमुख सुरेश सुरे, काकासाहेब ठोकळ, संजय शिंदे, स्वप्निल पांडे, योगेश त्रिभुवन, लंकेश गायकवाड, दिगंबर जाधव, विकास गायकवाड, संजय सोनवणे, लक्ष्मीकांत खरे, आबा चव्हाण, युवराज चव्हाण, योगेश निकम, सचिन कचवे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन उपतालुकप्रमुख शिवाजी थेटे व डॉ. सदाशिव पाटील यांनी केले.
































































