दहिसर विभाग क्र. 1 मधील शिवसेना पदाधिकारी जाहीर 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने दहिसर विधानसभा विभाग क्र. 1 मधील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. उपविभागप्रमुखपदी संदीप राऊत (वॉर्ड क्र. 1,7) यांची तर उपविधानसभा संघटकपदी विनोद वारे (वॉर्ड क्र. 1, 7) याची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती कळविण्यात आली आहे.