
शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने गडचिरोली जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. सुनील पोरट्टीवार- जिल्हा सहसंपर्कप्रमुख – (तालुका-कोर्ची, कुरखेडा, वडसा, आरमोडी, गडचिरोली, धानोरा), विलास कोडापे- जिल्हा सहसंपर्कप्रमुख – (तालुका-चार्मेशी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी, शिरोंचा), वासुदेव शेडमाके-जिल्हाप्रमुख (गडचिरोली विधानसभा), रियाझ शेख-जिल्हाप्रमुख (अहेरी विधानसभा), सुरेंद्र चंदेल-जिल्हाप्रमुख (आरमोरी विधानसभा), रामकृष्ण मडावी-जिल्हासंघटक-(गडचिरोली जिल्हा), श्रीकांत बनसोड-जिल्हा समन्वयक (गडचिरोली जिल्हा). शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.




























































