नाशिक जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नाशिक जिह्यातील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. जाहीर केलेल्या नियुक्त्यांमध्ये नाशिक जिल्हा (चांदवड, देवळा, दिंडोरी, पेठ, कळवण, सुरगाणा) प्रमुखपदी नितीन आहेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर  नाशिक जिल्हा (येवला, लासलगाव, निफाड, सटाणा) प्रमुखपदी कुणाल दराडे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे  शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

संजय सावंत जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख पदी

मुंबई, दि. 9 (प्रतिनिधी) – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)   पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख पदी संजय सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली.