508 झाडे तोडण्यास शिवसेनेचा विरोध, वृक्ष प्राधिकरण बैठकीत प्रस्ताव रोखला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shivsena-logo-new

मेट्रो रेल्वे-2 प्रकल्पासाठी 508 झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला शिवसेनेने विरोध केला असून वृक्ष प्राधिकणाच्या बैठकीत आज हा प्रस्ताव रोखण्यात आला. मुंबईच्या कोणत्याही विकासकामांना शिवसेनेचा विरोध नसून नाहक होणाऱया झाडांच्या कत्तलीला विरोध असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.

मेट्रो रेल्वे-2 प्रकल्पात अंधेरी डी. एन. नगर ते ओशिवरा मार्गासाठी 32 झाडे कापावी लागणार आहेत. तर 90 झाडे पुनर्रोपित करावी लागणार आहेत. तर गोरेगाव आणि बांगूरनगर मार्गात स्टेशनच्या बांधकामात येणारी 29 झाडे कापावी लागणार असून 85 झाडे पुनर्रोपित करावी लागणार आहेत. कांदिवली पश्चिम भागातील लालजी पाडा ते महावीर नगरदरम्यान 53 झाडे कापावी लागणार असून 21 झाडे पुनर्रोपित करावी लागणार आहेत. दहिसर पूर्व ते डी. एन. नगरपर्यंत 64 झाडे कापावी लागणार आहेत, तर 37 झाडे पुनर्रोपित करावी लागणार आाहेत. याशिवाय लिंक रोड ते चारकोप कारशेड डेपो मार्गात 11 झाडे कापणे आणि 86 झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. याबाबतचे प्रस्ताव आज वृक्ष प्राधिकरणाच्या समितीत प्रशासनाकडून मंजुरीसाठी मांडण्यात आले. मात्र शिवसेनेने झाडे तोडण्यास विरोध केल्यामुळे प्रस्ताव राखून ठेवल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.