आपल्याला विजयाची तुतारी वाजवायचीय, याचा आवाज दिल्लीपर्यंत गेला पाहिजे – उद्धव ठाकरे

फोटो - चंद्रकांत पालकर

सामना ऑनलाईन । हातकणंगले

शिवसेना-भाजप- रिपाइं महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हातकणंगले येथे जाहीर सभा घेतली. या सभेला प्रचंड गर्दी झाली होती.

वाचा उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचे ठळक मुद्दे –

 • धैर्यशील बोलल्याप्रमाणे कधीही भगवा झेंडा हातातून सोडणार नाहीत.
 • सीमेवर लढणाऱ्या जवानांना कळाल पाहिजे की भारतात काय तर महाराष्ट्रात सुद्धा मर्द जवान आहेत की जे जवानांच्या पाठीशी उभे राहणारे सरकार निवडून आणणार आहेत.
 • उन्हाळ्यामध्ये खासदारकीची निवडणूक होते. अशा या तळपत्या उन्हामध्ये धैर्यशील नावाचा तळपता सूर्य दिल्लीमध्ये हवा आहे.
 • राजू शेट्टी काय कसली शिट्टी? आपल्याला शिट्टी नको आहे आपल्याला विजयाची तुतारी वाजवायची आहे. याचा आवाज दिल्लीपर्यंत गेला पाहिजे.
 • जिल्हा साफ करण्यासाठी पहिला खासदार घालवा चांगला खासदार दिल्लीत पाठवा.
 • पंचगंगेचे काय झालं कधी होणार? उद्धव ठाकरे यांचा सवाल
 • शेतकरी जे आंदोलन करतील त्यांच्यासोबत शिवसेना जाहीरपणे सहभाग घेईल.
 • शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सामुहिक विवाह सोहळ्याचे शिवसेनेकडून आयोजन करण्यात आले.
 • कर्जबाजारी होऊन आणि मुला-मुलींच्या लग्नाच्या चिंतेने शेतकऱ्यांची आत्महत्या.
 • शेतकऱ्यांच्या पाठिशी शिवसेना उभी राहिली याचे मला समाधान.
 • महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला अभिमान वाटावा.
 • शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मला हसू पाहायचे आहे.
 • धैर्यशील माने लोकसभेत जाणार याची मला खात्री आहे.
 • शेतकऱ्यांचा खांद्याला खांदा लावून मी शेतकऱ्यांसाठी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत उभा आहे.
 • मी शेतकऱ्यांचा नेता नाही शेतकऱ्यांचा मित्र आहे.
 • शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ही निवडणूक आहे. गेली कित्येक वर्षे शेतकऱ्यांचा नेताच नाही.
 • धैर्यशील तुमच्या आशीर्वादाने तुमचेच प्रश्न सोडवण्यासाठी खासदारकीसाठी उभा आहे.
 • धैर्यशील बोलल्याप्रमाणे आता येथे विजयाची सभा घ्यायची आहे.
 • इतक्या प्रचंड गर्दी कडे पाहून नक्की कुठे बघून भाषण करावे हे समजत नाही.
 • उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात