शिवसेनेच्या वतीने वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा

807

राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार याही वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेच्या वतीने वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व तसेच लेखस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 10 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी या कालावधीत या स्पर्धा मुंबई येथे होणार आहेत.

गेल्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेला मुंबईसह मराठवाडा, विदर्भ, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकणात प्रचंड प्रतिसाद लाभला होता. त्याच अनुषंगाने या वर्षीही ही स्पर्धा घेतली जात आहे. स्पर्धेसाठी सात विषय देण्यात आले असून स्पर्धकाला त्यातील एका विषयावर दहा मिनिटे वक्तृत्व करावे लागणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक प्रदान केले जाणार आहे. अंतिम विजयी होणाऱ्या स्पर्धकांनाही उद्धव ठाकरे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व भरघोस रोख रकमेची पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहे.

इच्छुक स्पर्धकांनी नाव नोंदवण्यासाठी शुक्रवार 7 फेब्रुवारीपूर्वी सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळेत दादर येथील शिवसेना भवन येथे संपर्क साधावा. संपर्कासाठी 1800228595 हा दूरध्वनी क्रमांक देण्यात आला आहे. त्यावर आपले नाव, वय, तालुका, जिल्हा, व्हॉट्सऍप क्रमांक याची माहिती स्पर्धकांना द्यावी लागेल असे आवाहन शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात करण्यात आले आहे.

लेखस्पर्धेसाठी विषय ‘असा हवा…नवा महाराष्ट्र’

वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मृती राज्यस्तरीय लेख स्पर्धेसाठी ‘असा हवा…नवा महाराष्ट्र’ हा विषय देण्यात आला आहे. ही स्पर्धाही सर्वांसाठी खुली आहे. स्पर्धकांना या विषयावर महाराष्ट्राबाबतच्या त्यांच्या कल्पना 2500 शब्दांमध्ये लिहून आपल्या वैयक्तिक माहितीसह (नाव, वय, तालुका, जिल्हा, व्हॉट्सऍप क्रमांक) [email protected] या  ई-मेलवर शुक्रवार  7 फेब्रुवारीपूर्वी पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वक्तृत्व स्पर्धेचे विषय –

छत्रपती शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे

महाराष्ट्रावर बोलू काही

पाणी रे पाणी

हिंदुस्थानची अर्थव्यवस्था – सद्यस्थिती आणि भवितव्य

जातीचं काय करायचं..? व्यवस्थापन की निर्मूलन..?

लोकनायक माननीय उद्धवजी ठाकरे

स्पर्धेचे नियम व अटी

स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे

स्पर्धेसाठी एकच खुला गट आहे

दिलेल्या विषयांपैकी एका विषयावर बोलता येईल

त्येक स्पर्धकाला दहा मिनिटांचा वेळ

स्पर्धा ठरलेल्या दिवशी सकाळी 10 वाजता सुरू होईल

स्पर्धकांनी वेळेपूर्वी एक तास अगोदर सभागृहात हजर राहावे

परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील

आपली प्रतिक्रिया द्या