
पालिकेच्या कोस्टल रोडजवळील दिशादर्शक फलकावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसऐवजी ‘छशिमट’ लिहिणाऱ्या प्रशासनाचा दक्षिण मुंबई शिवसेना विभाग क्र. 12 च्या वतीने निषेध करण्यात आला. या फलकावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे पूर्ण नाव लिहिण्यात आले. विभागप्रमुख संतोष शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनप्रसंगी विधानसभा समन्वयक शिवाजी रहाणे, उपविभागप्रमुख संपत ठापूर, शाखाप्रमुख बाळा अहिरेकर, संतोष घरत, मंगेश सावंत, युवासेनेचे अजिंक्य धात्रक, सिद्धेश जगताप, विकास आडुळकर, अनिकेत हळदणकर, गौरव पाटील, यश काते, यश पवार, उपशाखाप्रमुख व शिवसैनिक उपस्थित होते.






























































