प्रत्येक संकटातून शिवसेनेने फिनिक्सप्रमाणे भरारी घेतली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मागील काही काळात अनेक घटना घडल्या आहेत. पण शिवसेनेने आजवर प्रत्येक संकटातून फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली आहे, असे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांनी आज ठामपणे सांगितले.

डॉ. नीलम गोऱहे यांनी पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोरोनानंतर जवळपास दोन वर्षांनी आपण गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा करीत आहोत. या उत्सवाच्या काळात आपण आपल्या आरोग्याची काळजीही घेण्याचे आवाहन त्यांनी केले. राजकीय घडामोडींच्या संदर्भात भाष्य करताना त्या म्हणाल्या की, जे कोणी गेलेले आहेत. त्यांचा शोक करीत बसू नका असे भगवत् गीतेत सांगितले आहे आणि त्याच भूमिकेतून काम चालले आहे. कधी ना कधी घर का भुला हुआ परत येईल असा मला स्वतःला विश्वास आहे. पण या संदर्भात जो काही अंतिम निर्णय घ्यायचा आहे तो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व पक्षाचे नेते आदित्य ठाकरे घेतील असे त्यांनी स्पष्ट केले.a