शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी नगरमध्ये विविध कार्यक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
balasaheb-nagar

सामना ऑनलाईन । नगर

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त आज नगर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याविशेष प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, युवासेनेचे जिल्हा अधिकारी विक्रम राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्यासह महिला आघाडी युवासेना तसेच नगरसेवक व शिवसैनिकांच्या वतीने शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद’, ‘शिवसेना झिंदाबाद’ अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या.