Photo – शिवसेना, मनसे, राष्ट्रवादीला उदंड प्रतिसाद; उद्धव आणि राज ठाकरेंच्या शाखांना भेटी, आदित्य व अमित ठाकरेंचाही प्रचारात धडाका

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी  मुंबईत शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी युतीला उदंड प्रतिसाद मिळत आहे. खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे युतीच्या उमेदवारांची निवडणूक कार्यालये, शाखांना भेटी देत असल्यामुळे  कार्यकर्ते-मतदारांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. शिवाय शिवसेना नेते–युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे हेदेखील प्रचारात उतरून कार्यकर्ते, मतदारांशी संवाद साधत असल्यामुळे पालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिवसेनामनसेराष्ट्रवादीच्या प्रभाग क्र. 202च्या उमेदवार शिवसेनेच्या श्रद्धा जाधव यांच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन रश्मी ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तेजस ठाकरे, शिवसेना नेतेखासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव सुधीर साळवी, आमदार अजय चौधरी, मनसे नेते बाळा नांदगावकर आदी उपस्थित होते.

शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी युतीच्या प्रभाग क्र. 79च्या अधिकृत शिवसेना उमेदवार मानसी जुवाटकर यांच्या निवडणूक कार्यालयाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट देऊन कार्यकर्तेमतदारांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना नेतेआमदार अॅड. अनिल परब, शिवसेना सचिवआमदार मिलिंद नार्वेकर, मीनल जुवाटकर, प्रवीण जुवाटकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारीकार्यकर्ते उपस्थित होते.

अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे कुणाल अशोक जाधव यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. ‘मातोश्रीनिवासस्थानी झालेल्या या पक्षप्रवेश सोहळय़ात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे शिवबंधन बांधून स्वागत केले. यावेळी शिवसेना नेतेआमदार अॅड. अनिल परब, शिवसेना सचिवआमदार मिलिंद नार्वेकर, प्रभाग क्र. 65 चे उमेदवार प्रसाद आयरे आदी उपस्थित होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रभाग क्र. 17च्या उमेदवार अश्विनी सरफरे यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या वेळी शिवसेना सचिवआमदार मिलिंद नार्वेकर, माजी आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख उदेश पाटेकर, विभागसंघटक शुभदा शिंदे, उपविभागप्रमुख मनोहर खानविलकर, शाखाप्रमुख सागर सरफरे, योगिनी लाड, वंदना सावंत, अजय पाटील यांच्यासह शिवसैनिकमनसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.