महिला दिनानिमित्त शिवसेना आणि रोटरी क्लबचा उपक्रम, पिंक रिक्षाचालकांचा आज सन्मान; रश्मी ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक महिला दिनानिमित्त शिवसेना आणि रोटरी क्लब मुंबई यांच्या वतीने रोटरी पिंक रिक्षा उपक्रम राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने रश्मी ठाकरे यांच्या हस्ते पिंक रिक्षाचालक महिलांना सन्मानित करण्यात येणार आहे. शिवसेना भवन, दादर येथे उद्या दुपारी 3 वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे.

कार्यक्रमाला शिवसेना उपनेत्या विशाखा राऊत, मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, शिवसेना सचिव सुप्रदा फातर्पेकर, राज्य समन्वयक रंजना नेवाळकर, रोटरी क्लब सदस्या अलका मुरली उपस्थित राहणार आहेत. गरजू महिलांसाठी शिवसेना आणि रोटरी क्लब मुंबई यांच्या वतीने पिंक रिक्षा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या योजनेत महिलांना मोफत ड्रायव्हिंग लायसन्स, मोफत रिक्षा बॅज बिल्ला, मोफत परमीट, रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण, सरकारी अनुदान तसेच इतर संपूर्ण मदत मिळवून दिली जाणार आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पिंक रिक्षाचालकांना सन्मानित करण्यात येणार असून महिलांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. दरम्यान, या कार्यक्रमाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय मेकअप आर्टिस्ट अर्चना ठक्कर यांच्यातर्फे महिलांना फ्री मेकअप प्रशिक्षण देण्यात येणार आहे.