नांदा सौख्य भरे! अजित पवार यांच्या शपथविधीवर उद्धव ठाकरे यांची खणखणीत प्रतिक्रीया

अजित पवार यांनी आज बंड करत भाजप व मिंधे गटाच्या गोटात ते सामिल झाले आहेत. राजभवनात रविवारी झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस यांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली, तर राष्ट्रवादीच्या आठ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या या बंडानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप, मिंधे गट व अजित पवार गट यांच्या तिहेरी सरकारवर बोलताना ‘नांदा सौख्य भरे’ अशी मोजक्या शब्दात खणखणीत प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली असून अजित पवार हे भाजप आणि मिंधे गटाच्या सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवारांनी राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी यावेळी मंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी यावेळी मंत्री पदाची शपथ घेतली आहे. यावेळी छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, अदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.