शिवसेनेची मशाल यांच्या बुडाला अशी लावा की हे पुन्हा महाराष्ट्रात येता कामा नये, उद्धव ठाकरे कडाडले

”हा महाराष्ट्र भोळा भाबडा आहे. पण मुर्ख नाही. कुणी प्रेमाने आलिंगन दिलं तर प्रेमाने आलिंगन देणार. पण जर कुणी पाठीत वार केला तर हा महाराष्ट्र त्याचा कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही. या 20 तारखेला जिथे जिथे शिवेसनेची मशाल आहे ती मशाला यांच्या बुडाला अशी लावा की हे पुन्हा महाराष्ट्रात येता कामा नये, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप व मिंधे गटावर केला. मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलामधील एमएमआरडीए मैदानावर शुक्रवारी महाविकास आघाडीची विराट सभा पार पडली. या सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी भाजप व गद्दार गटांची सालटी काढली.

”आज मुंबईत दोन सभा आहेत. एका बाजूला आपण आहोत. दुसऱ्या बाजूला गद्दार भाडोत्री आहे. तिथे बेअकली, नकली आहेत. असली शिवसेना, असली राष्ट्रवादीची ही सभा आहे. तिथे वक्ते भाडोत्री, नेते भाडोत्री, लोकंही भाडोत्री आणली आहेत. गंमत म्हणजे आपण ठरवलेलं आहे की हे 4 जून नंतर हे पंतप्रधान नसणार. ज्या प्रमाणे मोदींनी अचानक टीव्हीवर येऊन चलनी नोटा रद्द केल्या. डिमोनेटायझेशन केलं. तसंच मोदीजी आज बोलून घ्या. पंतप्रधान म्हणून शेवटचे आले आहात मुंबईत. 4 जूनला संपूर्ण देश डिमोदीनेशन करणार आहे. जसं चलनी नोटा त्या रात्रीनंतर फक्त कागदाचे तुकडे राहिले होते तसं तुम्ही 4 जून नंतर फक्त नरेंद्र मोदी राहाल, पंतप्रधान राहणार नाही, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

”मला काही लोकांची कीव येतो. जणू काही देशातले सर्व प्रश्न संपले आहेत असे वागतात. महागाई संपली आहे, रोजगारीचा प्रश्न संपलाय. चीन तिकडे ढेगेंमध्ये आडवा तिडवा घुसला आहे. तिकडे जायला मोदी -शहा तयार नाही. सगळी भाडोत्री फौज उद्धव ठाकरेला संपवायला इकडे आली आहे. मोदीजी मी आव्हान देतोय हिंमत असेल उद्धव ठाकरेला संपवायचा प्रयत्न करून बघा. हा महाराष्ट्र तुम्हाला इथल्या मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मोदींना आव्हान दिले.

”हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज शाहू, फुले, आंबेडकरांचा, महाराष्ट्र आहे तो शहा मोदी अदानीचा कधीही होऊ देणार नाही. तुम्ही कितीही डोकी आपटा. डोकी फुटतील. पण माझा मर्द मराठा एक सुद्धा फुटणार नाही. तुमच्याकडे सगळे गद्दार घेताय ते बरं आहे. जो निसर्गाचा नियम आहे. ऋतू येतात पानं उगवतात पानं सडतात. सडलेली पानं झडत नाही तोपर्यंत नवीन अंकुर फुटत नाही. माझ्या शिवसेना या वृक्षाने सडलेली पानं टाकून दिलेली आहे. ती तुमच्या कचरा गोळा करणाऱ्या गाडी वाल्याने गोळा करून तुमच्या पक्षात टाकली आहे. भाजप हा कचरा गोळा करणारा पक्ष झालेला आहे. कचरा जमाव पक्ष आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

”ही पहिली निवडणूक अशी आहे की मोदींना त्यांच्या प्रचाराची दिशाच सापडत नाही. त्यांना एक उन्माद चढला होता. देशातली जनता काहीही केलं तरी ऐकेल. चारसो पारचा नारा दिलेला. आपण एक नारा दिला अब की बार भाजप तडीपार. हा नारा दिल्यावर ते चिडीचूप झाले. त्यानंतर घराणेशाहीचा विषय काढला. तुमच्या घराण्यावर कसले संस्कार? कुणाचे ते माहित नाही. माझं घराणं ज्या मातीत जन्माला आले तिथे छत्रपती शिवाजी माहराज जन्माला आले. तुम्ही ज्या मातीत जन्मला आले तिथे औरंगजेब जन्माला आले”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

‘काय म्हणून महाराष्ट्राकडे मतं मागता. काय केलं तुम्ही महाराष्ट्रासाठी. चाळीस पेक्षा जास्त खासदार आम्ही तुम्हाला दिले. त्याचा मला पश्चाताप होतोय. पंतप्रधान झाल्यावर तुम्ही महाराष्ट्र मुंबई लुटली. आणि म्हणे बाळासाहेबांचे विचार आम्ही मानतो. पहिला हिंदुहृदयसम्राट बोलायला शिका. हा शब्द त्यांच्या भक्तांनी दिलेला नव्हता. जनतेनी त्यांना हिंदुहृदयसम्राट म्हटलं आहे. महाराष्ट्राचा आकस पदोपदी दिसलाय. मुंबई ही भिकारी करायला निघाला आहात. उद्योगधंदे गुजरातला पळवून नेले. परवा रोड़शो मध्ये यांचा उन्माद बघायला मिळाला. होर्डिंग कोसळून काही लोकं मृत्यूमुखी पडले. त्यांचं रक्तही सुकलं नसेल तिथे ढोल ताशे बडवत लेझिम वाजत गाजत स्वत:चा रोड शो केला. एवढे निर्दयी कसे झालात तुम्ही, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

”देश म्हणजे आहे तरी काय, भारतमाता आहे तरी कुठे. यांनी नाशिकच्या सभेत हिंदु मुसलमान सुरू केलं. तेव्हा एक शेतकरी बोलला कांद्यावर बोला. मोदींच्या डोळ्याकडे बघा. बघा कशी राक्षसी नजर आहे. शेतकरी तुमच्याकडे हमी भाव मागतोय त्याचं न ऐकता भारतमाता की जय असं ओरडताय. मग मोदीजी तुमची भारतमाता आहे तरी कुठे. माझी भारतमाता माझ्आ ,समोर बसलेली आहे. कांदा उत्पादक शेतकरी हा देखील भारतमाताच आहे. देश म्हणजे देशातली माणसं आहेत. दगडधोंडे म्हणजे नाही. कदाचित पंतप्रधान देशधोंडा असू शकेल पण देशातरी जनता नाही. मोदीजी संवेदनाहिन झाला आहात तुम्ही. दर वेळेला निवडणूक आली की हिंदु मुसलमान. आता त्यांच्या पोटात दुखतंय. मुसलमान सगळे इंडिया आघाडीसोबत येतायत. कधी त्यांना घुसखोर ठरवायचं. काल परवा मोदीजी बोलले की मी हिंदु मुसलमान भेद करेन त्या क्षणी मी राजकीय जीवनाचा त्याग करेन. मोदीजी तुम्हाला कधीच त्याग करायला हवा होता. मोदीजी तुम्ही भेदभाव करत नाही तर काय आम्ही करतो. कालपर्यंत तुम्ही मुसलमानांना शिव्या घालत होतात. अचानक तुम्हाला साक्षात्कार झाला की मी लहान असताना मुस्लीम कुटुंबासोबत वाढलो आहे. ताजियाच्या मिरवणूकीत खालून गेलेलो आहे. ईदला मुस्लीम कुटुंबांकडून जेवण यांयचं. मोदीजी ते जे जेवण यायचं त्यात तुम्ही ज्यावर बंदी घातली आहे ते पण होतं का? ते तुम्ही खाल्ल आहे का? अमित शहा काल बोलले मोदींना तिसऱ्या वेळेला पंतप्रधान करा. ते पंतप्रधान झाल्यावर त्यानंतर जो गोहत्या करेल त्याला उलटं टांगून सरळ करू. मग शहाजी आजपर्यंत काय करत होतात? गेली दहा वर्ष काय केलात तुम्ही? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

या सभेला काँग्रेसचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, AICC चे सचिव आशिष दुआ, बी. एम. संदीप, उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, शिवसेना खासदार संजय राऊत, तुषार गांधी आदी उपस्थित होते.

”देशातली जनता मोदींना सांगतेय की आम्हाला भूक लागलीय आम्हाला अन्न पाहिजे, नोकऱ्या पाहिजे, आम्हाला सुरक्षा पाहिजे. मोदी सांगतात. गप्प बसा नाहीतर मुसलमान येतील. या दहा वर्षात तुम्हाला सलोखा करता नाही आला. दर वेळेला पाकि्स्तानची भीती दाखवता. चीन बद्दल का नाही बोलता? बेरोजगारीबद्दल का नाही बोलत. मोदीजी तुम्ही शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला नकली संतान म्हणता. मोदीजी मी तुम्हाला आवाहन करतो. एका व्यासपीठावर या मी सांगतो माझ्या सात पिढ्याने काय केलं ते. तुम्ही सांगा मला तुमच्या सात पिढ्यांनी काय केलं. मोदीजी इथे जे मुंबईकर आहेत त्यांना मदत करायला पहिला धावून जातो तो शिवसैनिक जातो भाजपवाले जात नाही. कुठे अपघात, ब़ॉम्बस्फोट झाला. पूर आला.य तर शिवसैनिक जातो. तो वाचवणाऱ्याला विचारत नाही की तु कुठला आहेस उत्तर भारतीय आहे की मुंबईतला आहे, तु हिंदू आहेस की मुसलमान आहेस. अशा बचावकार्यात अनेक शिवसैनिकांनी रप्राण गमावले आहेत. मोदीजी तुमचा पक्ष स्वातंत्र्य लढ्यात, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात नव्हताच. तुमचे पूर्वज मोरारजी देसाई यांनी मराठी माणसांवर गोळ्या घातल्या होत्या 105 हुतात्मे झाले होते. संघर्ष करून रक्त सांडून ही मुंबई तकुम्हाला दिली आहे. त्यांनी पोलिसांना सांगि्तलेले की मी तुम्हाला गोळ्या वाया घालवायला दिलेल्या नाहीत. एवढी मस्ती आमच्याच घरात येऊन आम्हाला दाखवणार”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.