उद्धव ठाकरे नांदेडमध्ये दाखल, लोहामधील शेतकऱ्यांना दिला धीर

1027
uddhav-thackeray
फाईल फोटो

राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान केले आहे. ओल्या दुष्काळाने शेत उद्ध्वस्त झाल्याने हवालदिल झालेल्या बळीराजाला धीर देण्यासाठी, त्याला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्यात दौरे करत आहेत. मंगळावारी उद्धव ठाकरे यांनी नांदेडमधील येथील लोहा येथे शेतकऱ्यांन भेट देऊन त्यांची स्थिती जाणून घेतली. शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, शिवसेना तुमच्यासोबत आहे, असा धीर त्यांनी यावेळी दिला.

यानंतर पावणेबारा वाजता त्यांचा कंधार येथे दौरा होईल. कंधार येथून पुढे अहमदपूर आणि गंगाखेड येथे त्यांचा पाहणी दौरा होणार आहे. दुपारी साडेतीन वाजता उद्धव ठाकरे हे गंगाखेड येथून माजलगावकडे रवाना होणार आहेत. माजलगावनंतर गेवराई येथे जाऊन तेथील शेतांची पाहणी केल्यानंतर सायंकाळी 7 वाजता ते पुन्हा संभाजीनगरला रवाना होतील आणि तेथून नंतर साडेआठच्या सुमारास मुंबईकडे प्रयाण करतील अशी माहिती देण्यात आली आहे.

याआधी रविवारी त्यांनी मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतांची पाहणी केली. आता मंगळवारी ते पुन्हा मराठवाड्यात जाऊन बळीराजाच्या व्यथा जाणून घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या