शिवसेनाच कामगारांचे हित जोपासणार; संत मुक्ताबाई रुग्णालयातील कर्मचाऱयांचा विश्वास

पालिकेच्या घाटकोपर येथील संत मुक्ताबाई रुग्णालयातील कामगार-कर्मचाऱयांचा मेळावा नुकताच पार पडला. यावेळी कामगार-कर्मचाऱयांनी शिवसेनाच आपले हित जोपासणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आणि अध्यक्ष बाबा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या पाठीशी राहण्याचा निश्चय केला.

रुग्णालयातील कामगार, कर्मचाऱयांच्या एकजुटीमुळे ‘एकच युनियन, एकच झेंडा, एक नेता’ ही त्रिसूत्री प्रत्यक्षात अमलात आणून सर्वांनी इतर युनियनचे झेंडे बाजूला ठेवून शिवसेनेला पाठिंबा देत आपल्या न्याय्य हक्कासाठी फक्त म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनाच आपल्याला न्याय देऊ शकेल, हा विश्वास व्यक्त केला. रुग्णालयातील कामगार, कर्मचारी 100 टक्के युनिट सदस्यत्त्व स्विकारून भगवा फडकविण्याचे काम केले त्याबद्दल युनियनचे अध्यक्ष बाबा कदम यांनी सर्व कामगारांचे आभार मानून आपण युनियन नेत्यांवर दाखविलेला विश्वास सार्थकी लावण्याचे वचन दिले. हाच आदर्श पालिकेच्या इतर ठिकाणच्याही आस्थापनेत जायला हवा, असे मतही व्यक्त केले. कामगार कर्मचाऱयांच्या मेळाव्याला रुग्णालयाच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱयांनी उपस्थित राहून त्यांनी बाबा कदम यांचा सत्कार केला. डॉ. संजय बापरेकर यांनी बाबा कदम यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. यावेळी उपाध्यक्ष रंजना नेवाळकर, संजय वाघ यांनी कामगार, कर्मचाऱयांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत याची ग्वाही दिली. यावेळी रुग्णालयाच्या आवारात युनियनच्या नामफलकाचे अनावरण बाबा कदम यांनी केले व रुग्णालयाची कमिटी जाहीर करण्यात आली यामध्ये रुग्णालयाच्या युनिट अध्यक्ष पदी एकनाथ सोनावणे, उपाध्यक्षा प्रतिभा पाटील, सचिव अक्षता शिर्पे, उपसचिव श्रुतिका उतेकर, कार्याध्यक्ष राजू कांबळे, मनीष बोर्डे, लालजी वालोद्रा, वासुदेव विशे, सरगुरोह निसार ए.आर खान आणि महेश समेळ यांची निवड करण्यात आली.