नगरवर शिवसेनेचा भगवा, तीन ग्रामपंचायतींमध्ये दणदणीत विजय

46
nagar-gram-panchayat

सामना प्रतिनिधी । नगर

नगर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तीन ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकला आहे. या निकालानंतर शिवसेनेतर्फे नवनिर्वाचित सदस्यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. नगरमध्ये ग्रामपंचायती निवडणुका पार पडल्या होत्या. यामध्ये भोयरे पठार, पारगाव, पारेवाडी अशा तीन ठिकाणी शिवसेनेची सत्ता आली आहे.

नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार शिवसेनेच्या वतीने करण्यात आला. यावेळी उपनेते अनिल राठोड व जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्यासह नगर तालुका प्रमुख राजेंद्र भगत, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, नगरसेवक योगीराज गाडे, सभापती रामदास भोर, हर्षवर्धन कोतकर, पंचायत समिती सदस्य संदीप गुंड, उपसभापती प्रवीण कोकाटे, आदी यावेळी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या