दुष्काळ गंभीर तरी शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर- आदित्य ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नांदेड

नांदेडपासून काही अंतरावर असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या कोनशिला योजनेचे उद्घाटन आज युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद सांधला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यांनी शेतकऱ्यांच्या पशूसाठी पशूखाद्य वाटप केले. यावेळी स्थानिक आमदार आमदार हेमंत पाटील हे देखील उपस्थित होते.

शेतकऱ्यांशी संवाद साधण्याआधी आदित्य ठाकरे यांनी तेथील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर बोलताना आदित्य ठाकरे यांनी मराठवाड्यात शिवसेनेकडून करण्यात आलेल्या कामांचा उल्लेख करण्यात आला. तसेच कुणाही शेतकऱ्याला समस्या असेल तर त्यांनी शिवसेनेकडे या तुम्हाला नक्की मदत मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दुष्काळ गंभीर तरी शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर आहे, हे विसरू नका असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.