‘राजा राणीची ग जोडी’ मालिकेतील संजूने नव्या वेबसिरीजसाठी दिले बोल्ड सिन

राजा राणीची ग जोडी या मालिकेतून घराघरात पोहोचलेली संजू म्हणजेच अभिनेत्री शिवाणी सोनार हि तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या वेब सिरीजमध्ये बोल्ड अवतारात दिसली आहे. झी मराठीवरील मालिकेत साध्या भोळ्या सुनेची भुमिका करणारी शिवानी अचानक किसिंग सिन देताना दिसल्याने चाहतेही आश्चर्यचकीत झाले आहेत.

शिवानी सोनार हिची “वन बाय टू” वेबसिरीज नुकतीच एमएक्स प्लेयरवर रिलीज झाली आहे., निखिल रायबोले, भूपेंद्रकुमार नंदन यांच्या कॅफेमराठी प्रस्तुत आणि बाप फिल्म्स, रिझॉन्स स्टुडिओ निर्मित “वन बाय टू” हि मराठी वेबसिरीज रिलेशनशिपमधील विश्वासावर आधारित एक कॉमेडी आहे. वन बाय टू ही कॅफे मराठीची ं15 वी वेबसिरीज आहे.

वन बाय टू’ वेब सिरीजमध्ये रोहित निकम, शिवानी सोनार, अनामिका डांगरे, श्रेयस गुजार, आदित्य हविले, आरोही वकील, रवींद्र बंदगार आणि अभय महाजन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या वेबसिरीजच्या माध्यमातून कलर्स मराठी वाहिनीवरील ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेतील अभिनेत्री शिवानी सोनार डिजिटल विश्वात पदार्पण करत आहे. एक वेगळ्या आणि आकर्षक अशा भूमिकेत शिवानी सोनार दिसणार आहे, असे निखिल रायबोले यांनी सांगितले.

या सिरीजविषयी भुपेंद्रकुमार नंदन सांगतात की, आपल्या आयुष्यात असणारे प्रत्येक नाते हे दोन गोष्टींवर टिकून असते ते म्हणजे लॉयलटी म्हणजेच खरेपणा आणि विश्वास. पण सध्याच्या जगात किंवा सध्याच्या युथ जनरेशन मध्ये या दोन्ही गोष्टी नष्ट होताना दिसत आहेत. अशाच प्रेमाच्या लॉयलटीवर आधारित हि ‘वन बाय टू’ मराठी वेब सिरीज नक्कीच आजच्या तरुण वर्गाला आवडेल यात शंका नाही.

आपली प्रतिक्रिया द्या