
त्यांच्याच बगलबच्चांनी त्यांची पेंटिंग काढायची आणि आपल्यावर लोकांचे प्रेम असल्याचे सांगणे, हे वागणे खरे नाही. जनतेचे इतकेच प्रेम होते, मग लोकसभा निवडणुकीत पडलात कसे? असा खोचक सवाल शिवेंद्र राजे भोसले यांनी राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांना केला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या पेंटिंगवरून सुरू असलेल्या वादावर बोलताना शिवेंद्रराजे भोसले यांनी ही टिका केली. पेंटिंग त्रयस्थ लोकांनी काढले असते तर ठीक होते, असा टोलाही त्यांनी लगावला.




























































