मार्ग चुकला पण उद्देश प्रामाणिक!शिवलीला पाटील यांनी मागितली वारकरी संप्रदायाची माफी

बिग बॉस’ मराठीचे तिसरे पर्व सुरू आहे. प्रसिद्ध कीर्तनकार शिवलीला पाटील बिग बॉसच्या घरात गेल्यापासून चर्चेत होत्या. अनेकांना त्याचे रिऑलिटी शोमध्ये जाणे आवडले नव्हते. यावरून त्या सोशल मीडियावर ट्रोल झाल्या होत्या. त्यानंतर आजारपणाच्या कारणामुळे शिवलीला नुकत्याच ‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्या. बाहेर आल्यावर त्यांनी वारकरी संप्रदायाची माफी मागितली आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिवलीला म्हणाल्या,    माझ्या ‘बिग बॉस’मध्ये जाण्याच्या निर्णयाने वारकरी संप्रदाय आणि माझे ज्येष्ठ माझ्यावर नाराज आहेत. मी त्यांची दोन्ही हात जोडून आणि नतमस्तक होत माफी मागते. माझे विचार लोकांपर्यंत पोहोचवणे हाच शुद्ध हेतू होता. मी निवडलेला मार्ग चुकीचा असला तरी उद्देश प्रामाणिक होता. यापुढे ज्येष्ठांचा सल्ला घेतल्याशिवाय मी असा निर्णय घेणार नाही.

शिवलीला या महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय महिला कीर्तनकार आहेत. सोलापूर जिह्यातील बार्शी हे शिवलीला  यांचे मूळ गाव. संत साहित्य, संस्कृती या विषयांवरील त्यांच्या कीर्तनाचे व्हिडीओ मोठय़ा प्रमाणात पाहिले जातात.

आपली प्रतिक्रिया द्या