सर्वांना राम राम… शिवराज सिंह चौहान यांच्या पोस्टने चर्चांना उधाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशमध्ये भाजपच्या विजयानंतर आठवडा उलटला तरी अद्याप मुख्य़मंत्री कोण होणार याची घोषणा झालेली नाही. त्यामुळे नक्की मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावर कुणाची वर्णी लागतेय, शिवराज सिंह चौहान यांना डच्चू मिळतोय का? अशा विविध प्रश्नांवर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. एकीकडे अशी चर्चा सुरू असतानाच शिवराज सिंह चौहान यांनी शनिवारी सकाळी एक ट्विट करत या चर्चेला आणखी खतपाणी घातले आहे.

शिवराज सिंह चौहान यांनी ट्विटरवर त्यांचा विजयानंतरच्या जल्लोषातील हात जोडलेला फोटो शेअर केला आहे. त्यासोबत त्यांनी सभी को राम राम ( सर्वांना राम राम) एवढीच एक ओळ लिहली आहे. त्यावरून त्यांचे हे रामराम नक्की कोणत्या गोष्टीचे संकेत देत आहेत याची चर्चा रंगली आहे. शिवराज सिंह अशा प्रकारे राम राम बोलून जनतेची रजा घेत आहेत का असा प्रश्न केला जात आहे.

सोमवारी मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री निवडण्यासाठी सर्व आमदारांची संध्याकाळी चार वाजता बैठक बोलवण्यात आली आहे. त्या बैठकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा दावेदार घोषीत केला जाणार आहे.