
सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ
पुलवामा येथे हिंदुस्थानी जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सर्वत्र निषेध केला जात आहे. पाकड्यांच्या या कृत्याविरोधात परळीत राष्ट्रीय ध्वज पाकिस्तानचा चाँद तारा जाळून तीव्र निषेध करण्यात आला. पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत चाँद ताऱ्याचे दहन करण्यात आले.
गुरुवारी पूलवाम्यात हिंदुस्थानी जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशाचे ४४ जवान धारातीर्थी पडले. या घटनेचा शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात पाकिस्तानचा राष्ट्रीय ध्वज असलेल्या चांद ताऱ्याची होळी करण्यात आली.
यावेळी शिवसेना बीड जिल्हा उपप्रमुख अभयकुमार ठक्कर, तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे, हिंदुस्थानी विद्यार्थी सेना बीड जिल्हाप्रमुख प्रा.अतुल दुबे, जिल्हासह संघटक रमेश चौंडे, विधानसभा प्रमुख राजाभैय्या पांडे, शहर प्रमुख राजेश विभूते, उपशहरप्रमुख अभिजित धाकपाडे, मोहन राजमाने,अमर टाकळकर, मोहन परदेशी, संतोष चौधरी, अमित कचरे, गजानन कोकिळ, बजरंग औटी, शुभम जोशी, रोहित ताटीपामल, कृष्ण देवकर, संजय सोमाणे यांच्यासह असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
































































