शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात सामाजिक उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईसह राज्यात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. गरीबांना जीवनावश्यक साहित्य, आरोग्य-रक्तदान शिबिरे, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सदस्य नोंदणी मोहीमही राबवण्यात आली.

वरळी विधानसभा शाखा क्रमांक 195च्या वतीने दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना उपनेते-आमदार सचिन अहिर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन शाखाप्रमुख विजय भणगे, शाखा संघटक सुजाता सावंत, शाखा समन्वयक किरण गावडे आदींनी केले होते.

शिवसेना युवासेना शाखा क्र. 72 युवा शाखा अधिकारी हंसराज गुप्ता यांच्या वतीने विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर, विधानसभा संघटक संजय कदम, शाखाप्रमुख संजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

माजी उपमहापौर अॅड. सुहास वाडकर यांच्या माध्यमातून नागरी निवारा परिषद संचालित, निवारा विद्यालय शाळेतील संगणक सुविधेचे उद्घाटन विभागप्रमुख, आमदार यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी नगरसेवक तुळशीराम शिंदे, उपविभागप्रमुख भाई परब, मुख्याध्यापिका समीक्षा साळकर, निवारा विद्यालयाचे विश्वस्त विनायक जोशी, आदी उपस्थित होते.