
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने संपर्कप्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रच्या संपर्कप्रमुखपदी नितीन बानगुडे पाटील यांची तर सातारा जिह्याच्या संपर्कप्रमुखपदी शेखर भगवान गोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.





























































