ठेकेदार कंपनी कोठारीला काळ्या यादीत टाका, शिवसेनेचे नगरसेवका बोराटे यांची आयुक्तांकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

महापालिकेतील ठेकेदार कंपनी ए. सी. कोठारी यांनी अनेक कामांचे कार्यारंभ आदेश घेऊनही सुमारे 40 ते 50 कोटींची कामे अद्यापही सुरू केलेली नाहीत. त्यामुळे शहराच्या विकासाला खीळ बसली असून ए. सी. कोठारी यांना नोटीस बजावून त्यांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी माजी विरोधी पक्ष नेते व नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केली आहे.

नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी आयुक्तांना निवेदन दिले असून, ए. सी. कोठारी यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी केलेली आहे. निवेदनात म्हटले की, सावेडी नाट्यगृह, सीना नदीवरील पुलासह अनेक विविध कामांचे कार्यारंभ आदेश ए. सी. कोठारी यांना दिलेले आहेत. 2010 ते 2012 पासून अनेक कामे त्यांनी सुरू केलेली नाहीत. त्यामुळे शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. कामे रखडल्यामुळे महापालिकेला नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. वरील कामांना आचारसंहितेचे कुठलेही बंधन नसतांना कामे रखडविण्यात आली असल्याने ए. सी. कोठारी यांना ‘क्लॉज 3’ची नोटीस बजावून काळ्या यादीत टाकावे. त्यांच्याकडील सर्व कामे रद्द करुन या कामांच्या फेरनिविदा काढाव्यात, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.