पालम येथे महायुतीचे खासदार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ सभा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पालम

पालम येथे महायुतीचे उमेदवार खासदार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ आज जलसंवर्धन तथा राजशिष्टाचार मंत्री राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली प्रचारसभा पार पडली.

यावेळी जलसंवर्धन मंत्री राम शिंदे म्हणाले की, केंद्र सरकारने व राज्य सरकारने सर्व सामान्य माणूस हा केंद्र बिंदू माणून शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या योजनांची घोषणा करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर दिला. त्यामध्ये प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना, आयुष्यमान भारत योजना, जलयुक्त शिवार योजना, या सारख्या लोकाभिमुख योजना राबविण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य प्रकारे किंमत मिळावी यासाठी हमीभाव किंमती मध्ये शेत मालाची खरेदी करण्यासाठीचे सक्तीचे आदेश काढून शेतकऱ्यांच्या मालाला योग्य प्रकारे शेतमालाला भाव मिळवून दिला तसेच परभणी जिल्ह्यातील प्रत्येक महामार्गावर खड्डय़ाचे साम्राज्य होते ते रस्ते आज खड्डे मुक्त होत आहेत. या कामासाठी खासदार संजय जाधव यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे वारंवार पाठपूरावा करून जिल्ह्यातील प्रत्येक महामार्गाची कामे चालू केलेली आहेत. त्यामुळे जनतेने जातीपातीच्या राजकारण व विकास कामाच्या बाबतीत आडकाठी आणून राजकारण करणाऱ्या उमेदवारांना सत्तेपासून दूर ठेवा आणि परभणी जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात विकास कसा होईल या उद्देशाने केंद्रात वारंवार आवाज उठवणाऱ्या तसेच शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नावर गांभीर्याने विचार करून त्यांना न्याय कसा मिळवून देता येईल, या विचाराने झपाटलेल्या व विकासाभिमुख व निस्वार्थपणे आपले कर्तव्य बजावून सर्वसामान्य जनतेच्या हिताचे काम करणाऱ्या महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार संजय जाधव यांना येत्या १८ एप्रिल रोजी बहुमताने विजयी करा, असे आवाहन जनतेला केले.

यावेळी महायुतीचे उमेदवार संजय जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष अभय चाटे, जिल्हाप्रमुख विशाल कदम, विठ्ठलराव रबदडे, गणेशराव रोकडे, डॉ. सुभाष कदम, सुरेश बंडगर, अ‍ॅड व्यंकटराव तांदळे, सुभाषराव धुळगंडे, तालुकाध्यक्ष भागवत बाजगीर, तालुकाध्यक्ष हनुमंतराव पौळ, साहेबराव सुरणर, ओमकार सिरस्कर, व्यंकटराव पौळ, रामभाऊ लटके, बाळासाहेब रोकडे, गजानन पवार, गणेशराव घोरपडे, दत्तराव घोरपडे, चंद्रकांत ताटे, श्रीकांत कराळे, ज्ञानोबा पवार यांच्यासह मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचं प्रास्ताविक सुरेश भुमरे यांनी केले. आभार भागवत बाजगिर तर सूत्रसंचालन पदुदेवा जोशी यांनी केले.