गडचिरोली जिह्यातील प्रभारी शिवसेना  पदाधिकारी जाहीर

389

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने गडचिरोली जिह्यातील प्रभारी शिवसेना पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

संपर्कप्रमुखपदी किशोर पोतदार (गडचिरोली जिल्हा), सहसंपर्कप्रमुखपदी डॉ. रामकृष्ण मडावी (गडचिरोली जिल्हा) यांची तर जिल्हाप्रमुखपदी राजगोपाल सुलवावार (विधानसभा-अहेरी), अशोक धापोडकर (विधानसभा-आरमोरी, गडचिरोली) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. जिल्हा संघटकपदी अरविंद कात्रटवार (गडचिरोली जिल्हा), उपजिल्हाप्रमुखपदी राजू कावळे (गडचिरोली विधानसभा), अरुण धुर्वे (अहेरी विधानसभा), भरत जोशी (आरमोरी विधानसभा) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. विधानसभा संघटकपदी नंदू कुंबरे (गडचिरोली विधानसभा), राजू अंबानी (आरमोरी विधानसभा), बिरजू गेडाम (अहेरी विधानसभा) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तालुकाप्रमुखपदी गजानन नैताम (गडचिरोली तालुका), महेंद्र शेंडे (आरमोरी तालुका), अमित यासलवार (चामोर्शी शहर), पप्पी पट्टाण (चार्मोशी ग्रामीण), शेखर उइके (धानोर तालुका), श्रीकांत बनसोड (वडसा तालुका) यांच्या तर शहरप्रमुखपदी रामकिरीट यादव (गडचिरोली शहर), उपशहरप्रमुखपदी घनशाम कोलते (गडचिरोली शहर) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्याची शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या