सोयाबीन पिकविमा प्रश्नी शिवसेना आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shivsena-logo-new

सामना प्रतिनिधी, बीड

सन 2018 च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील 63 महसूल मंडळामध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचे नुकसान झाले होते. विमा कंपनीने सोयाबीन वगळून अन्य पिकांना विमा लागू केला आहे. परंतू सोयाबीनच्या विम्याची रक्कम देण्यास विमा कंपन्या टाळाटाळ करत असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. कंपनीने येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांना सोयाबीन विम्याचे पैसे न दिल्यास शिवसेना जिल्हा भरात रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा बीडचे शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

पत्रकात त्यांनी पुढे म्हटले की, जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशावेळी जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी विमा वाटपास दिरंगाई केली जात आहे. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम व ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीचे नोडल अधिकारी मिलींद ताकतोडे यांनी समन्वय साधून तात्काळ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात विमा वर्ग करण्यात यावा अशी मागणी सचिन मुळूक यांनी केली आहे. येत्या आठ दिवसात सोयाबीनचा विमा खात्यावर जमा न केल्यास जिल्ह्यात शिवसेना तिव्र आंदोलन छेडणार असल्याचे ते म्हणाले.