
सामना प्रतिनिधी । माजलगाव
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ व शिवसेना शाखा माजलगाव व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई – ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील 14 गावात 14 दिवस मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले असून बुधवारी राजेवाडी येथून या शिबिराची सुरुवात झाली.
या शिबीरात डोळ्यांची तपासणी करून चष्मा 90 रूपयात , तसेच लांबचा, जवळचा दोन्ही एकत्र चष्मा 180 रूपयात बनवून देण्यात आला.तर आरोग्य तपासणी करून मोफत औषधेही देण्यात आली. या शिबीराचा 235 रुग्णांनी लाभ घेतला. लोककल्याण आरोग्य केंद्राचे डॉ. ए.बी गवळी, डॉ. राहुल मुंडे, डॉ. अनिल चव्हाण, डॉ. प्रतीक चव्हाण यांनी तपासणी केली.या शिबिरप्रसंगी उपजिल्हाप्रमुख रामराजे सोळंके, तालुकाप्रमुख अप्पासाहेब जाधव,सुनील खंडागळे, प्रल्हादराव सोळंके, शहरप्रमुख धनंजय सोळंके, अॅड. दत्ता रांजवण, दासु बादाडे, किशोर पवार, सरपंच साहेबराव आव्हाड,तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी थेटे, पांडुरंग गोजे, लक्ष्मण महागोंविद, गणेश थेटे, विश्वबर थेटे, अशोक थेटे यांची उपस्थिती होती. 6 ते 19 फेब्रुवारीपर्यंत माजलगाव तालुक्यातील पात्रुड, नित्रुड,सांडसचिंचोली, कोथरुळ,आनंदगाव, उमरी पारगाव,मालीपारगाव,मंजरथ,मोगरा,गुंजथडी, किट्टीआडगाव, लोणगाव, नाकलगाव इत्यादी गावात प्रत्येकी एका दिवसासाठी शिबीर होणार आहे. शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेनेने केले आहे.


























































