शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा झंझावाती कोकण दौरा, खळ्यात बसून कोकणवासियांशी साधणार संवाद

शिवसेना नेते,युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे कोकण दौऱ्यावर येत आहेत. आदित्य ठाकरे यांच्या झंझावाती दौऱ्यामुळे शिवसैनिकांच्यात चैतन्य संचारले आहे. दोडामार्ग पासून नागोठणे दरम्यान हा झंझावाती दौरा होणार आहे. या दौऱ्यात खळा बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. घराबाहेरील खळं हे कोकणचे वैभव आहे. या खळ्यात बसून शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे कोकणवासियांशी संवाद साधणार आहेत.

23 नोव्हेंबर पासून दौऱ्याला सुरूवात होणार आहे. 23 नोव्हेंबर सकाळी 11 वाजता रोजी दोडामार्ग येथील लीना कुबल यांच्या घरासमोर खळा बैठक,सवा बारा वाजता सावंतवाडी येथील चंद्रकांत कासार यांच्या घरासमोर खळा बैठक, दीड वाजता कुडाळ येथे मंदार शिरसाट यांच्या घरी भेट, 1 वा.50 मि.बांबर्डे येथे स्नेहा दळवी यांच्या घराजवळ खळा बैठक, तीन वाजता कणकवली येथे सतीश सावंत यांच्या घरी खळा बैठक, सायंकाळ 5 वाजता राजापूर येथे प्रफुल कांबळे यांच्या घराबाहेर खळा बैठक,सवा सात वाजता रत्नागिरीतील करबुडे येथे विनोद शितप यांच्या घराबाहेर खळा बैठक होईल.

दिनांक 24 नोव्हेंबर रोजी चिपळूण येथे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्या निवासस्थानी शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे भेट देणार आहेत. 12 वा 35 मि.शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांच्या घराबाहेर खळा बैठक, दुपारी 1 वा.5 मि.चिंचघर खेड येथे माजी आमदार संजय कदम यांच्या घराबाहेर खळा बैठक, 2 वा.25 मि. महाड येथे खळा बैठक, 5 वा.50 मि.नागोठणे येथे किशोर जैन यांच्या घराबाहेर खळा बैठक आयोजित करण्यात आली आहे.