MIDC सहाय्यक अभियंता परीक्षेच्या तारखेत बदल करावा, कैलास पाटील यांची मागणी

MIDC सहाय्यक अभियंता आणि UPSC IEC ची मुख्य परीक्षेची तारीख एकाच दिवशी आल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना कोणत्या तरी एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची वर्षानुवर्षांची मेहनत वाया जाईल. या सर्व गोष्टींचा विचार करून MIDC सहाय्यक अभियंता परीक्षेच्या तारखेत बदल करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार कैलास पाटील यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना केली आहे.

आमदार कैलास पाटील यांनी ट्वीटवर (X) पोस्ट करत उदय सामंत यांनी MIDC सहाय्यक अभियंता परीक्षेच्या तारखेत बदल करावा अशी मागणी केली आहे. “MIDC सहाय्यक अभियंता भरतीची परीक्षा येत्या 10 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. परंतु, त्याच दिवशी UPSC IES ची मुख्य परीक्षा देखील ठेवली आहे. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे अनेक उमेदवारांना कोणत्या तरी एका परीक्षेवर पाणी सोडावे लागणार आहे. वर्षानुवर्षे दोन्ही परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांवर हे अन्याय केल्यासारखे आहे. त्यामुळे उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांना माझी विनंती आहे की, आपल्या विभागामार्फत घेण्यात येणारी MIDC सहाय्यक अभियंता भरती परीक्षेच्या तारखेत बदल करून त्यासंदर्भातील परिपत्रक तातडीने जाहीर करावे आणि विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा.” असं म्हणत कैलास पाटील यांनी उदय सामंत यांना परीक्षेच्या तारखेत बदल करण्याची मागणी केली आहे.

बिहारमध्ये मतदार यादीतून वगळलेल्या 65 लाख मतदारांची माहिती द्या; सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश