हिंगोलीत आखाडा बाळापूर येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन

441

हिंगोलीतील कळमनुरी तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या आखाडा बाळापूर येथील बाळापूर वाडी व अन्य भागात शिवसेना शाखांच्या नामफलकाचे अनावरण शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्या हस्ते करण्यात आले. बाळापुर शहरात व बाळापुरवाडी येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले. बांगर यांनी तीन दिवसांपासुन पदाधिकाऱ्यांसह सिरसम, नांदापूर व आखाडा बाळापूर जि.प. गटातील 30 गावांना भेट देत नागरिकांना शिवसेनेला साथ देण्याचे आवाहन केले आणि त्यांच्या समस्या अडीअडचणी समजावुन घेतल्या.

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी जनआशीर्वाद दौऱ्यादरम्यान शिवसेना व युवासेना पदाधिकाऱ्यांनी गावोगावी व घरोघरी जाऊन नागरिकांच्या अडचणी समजावुन घेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच लोकसभा निवडणुकीत मतदान केलेल्या मतदारांचे आभार मानून ज्यांनी मतदान केले नाही, त्यांचे मन जिंकण्याचे प्रयत्न करावे अशा सूचना केल्या होत्या. शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी हिंगोली जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र शिखरे, पं.स. उपसभापती गोपु पाटील, तालुकाप्रमुख सखाराम उबाळे, उपजिल्हाप्रमुख डी.के. दुर्गे, बालाजी बोंढारे, शेषराव बोंढारे, कानबाराव गरड, अनिल अमिलकंठवार, मोहनसिंग बयास, सोपान बोंढारे यांच्यासह आखाडा बाळापूर जिल्हा परिषद गटातील तसेच कांडली, काळ्याची वाडी, रुद्रवाडी, कुपटी, डोंगरगाव पूल या गावात भेटी देऊन नागरिकांसमवेत संवाद साधला. बाळापूर शहरात व बाळापुरवाडी येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यासोबतच 23 व 24 ऑगस्ट रोजी नांदापूर जिल्हा परिषद गट व कळमकोंडा, जांभरुन, वारंगा मसाई, सावंगी भूतनर, रेणापूर, हारवाडी, सालेगाव, सांडस, पुयणा, पाळोदी, गिरामवाडी, मालेगाव, सिरसम गटातील भटसावंगी तांडा, सावरगाव, पिंपळदरी, खडकद, गाडीबोरी, दुर्गसावंगी, तिखाडी या गावांनाही भेटी दिल्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्य गणाजी बेले, राम कदम हेदेखील उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या