
महापालिकेत शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून देण्यासाठी जोमाने कामाला लागा, असे प्रतिपादन उद्योग मंत्री, शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी केले. प्रभाग क्र. 1मधील शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कोरोनाशी लढा देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेनापतीप्रमाणे राज्याला मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार काम केल्यामुळेच मुंबईसह राज्यातही कोरोना नियंत्रणात येत असल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेला आता चांगलेच यश येत असल्याचेही ते म्हणाले. टाळेबंदीतून बाहेर पडताना आपण ‘पुनःश्च हरिओम’ केले त्याचप्रमाणे संघटनात्मक पातळीवरही आता पदाधिकाऱयांनी जोमाने कामाला लागण्याची गरज असल्याचे देसाई म्हणाले. तर कोविडच्या काळात विभागातील शिवसेना पदाधिकाऱयांनी कौतुकास्पद कामगिरी केली असून आता शिवसेना सदस्य नोंदणी वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत असे आवाहन मेळाव्याचे आयोजक विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस यांनी केले. विभागातील आजी-माजी पदाधिकाऱयांनी पक्षवाढीसाठी एकत्रितपणे काम करावे असे आवाहन ‘म्हाडा’चे सभापती विनोद घोसाळकर यांनी केले. पुढील पालिका निवडणुकीत आणखी यशस्वी होण्यासाठी प्रत्येक प्रभागात ‘वॉर रूम’ तयार करावी असे उपनेते विश्वनाथ नेरूरकर म्हणाले. यावेळी शिवसेना विभाग क्र. 1च्या आयसीयू व व्हेंटिलेटरयुक्त रुग्णवाहिकेचे लोकार्पणही करण्यात आले. तसेच माझे कुतूहिमेवर आधारित नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी विभागातील नागरिकांना विनामूल्य देण्यासाठी तयार केलेल्या ‘मास्क वाटप’ उपक्रमाचे उद्घाटनही करण्यात आले. यावेळी आमदार प्रकाश सुर्वे, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, प्रभाग समिती अध्यक्षा सुजाता पाटेकर, विभाग संघटक सुजाता शिंगाडे उपस्थित होते.


























































