रशिया, चीनचा पॅटर्न देशात लागू केला काय? संजय राऊत संतापले, गृहमंत्र्यांना केलं लक्ष्य

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याबाबत चिंता व्यक्त करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी धनकड आणि राष्ट्रीय सुरक्षेबाबात चिंता व्यक्त केली आहे. धनकड यांनी राजीनामा दिल्यानंतर ते प्रसार माध्यमांसमोर आलेले नाही किंवा दिसलेले नाहीत. त्यामुळे विरोधकांनी आता चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे धनकड नेमके कुठे आहेत, याची केंद्रीय गृहमंत्र्यांनी माहिती द्यावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

अद्याप नवीन उपराष्ट्रपतींची निवडणूक झालेली नाही. त्यामुळे जगदीप धनकड हे काळजीवाहू उपराष्ट्रपती आहेत. देशाची उपराष्ट्रपती कुठे आहेत. गेल्या 20-25 दिवसांपासून त्यांचा ठावठिकाणा नाही. त्यांच्या अस्तित्वाचा पत्ता नाही.ते कुठे आहेत, कसे आहेत, त्यांचे काय झाले, त्यांची प्रकृती कशी आहे, याबाबत जनतेकडून चिंता व्यक्त होत आहे. ज्या पद्धतीने ते अदृश्य किंवा गायब झाले, ही सर्व राजकीय पक्षांसाठी चिंतेची बाब आहे. या देशात चीन आणि रशियाचा पॅटर्न राबवला जात आहे का? आपल्याला नको असलेल्या व्यक्तींना गायब करायचे हा पॅटर्न राबवला जात आहे का? असा सवालही त्यांनी केला. असा पॅटर्न लागू झाला असल्यास सरकारने त्याची माहिती द्यावी, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.

आमच्या विरोधात किंवा आमच्या विचारांविरोधाल वागतील, त्यांना गायब करू, असे सरकारचे धोरण आहे काय, चीन रशियामध्ये तेच होत आहे. 21 जुलै रोजी त्यांनी सभागृहात येत कामकाज केले. त्यांची प्रकृती उत्तम होती. त्यांतर संध्याकाळी राजीनामा दिल्यानंतर ते गायब झाले. त्यामुळे गृहमंत्र्यांनी याबाबतची माहिती द्यावी. याबाबत आम्ही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानंतर त्यांचा कोणाशीही संपर्क नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात हॅबियस कोर्पस दाखल करणार आहोत.धनकड यांना राजीनामा देण्यासाठी का सक्ती करण्यात आली, या प्रकरणात नेमके काय झाले, हे देशासमोर येण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.