देशहितासाठी सत्ताधाऱ्यांबाबत कठोर भूमिका घ्यायच्या असतात, तेव्हा संघाने त्या भूमिका घेतलेल्या नाहीत; संजय राऊत यांचे परखड मत

नागपूरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या दसार मेळाव्याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मत व्यक्त केले. संघाला 100 वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल त्यांनी संघाला शुभेच्छा दत परखड मतही व्यक्त केले. संघांच्या मेळाव्याला सध्या सत्तेचे तेज आहे. मात्र, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या नेत्यांशी संघांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, त्याबाबतही संजय राऊत यांनी परखड मत व्यक्त केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा नागपूरमध्ये होतो. त्यांची परंपरा आहे, संघाला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांचे संचलन होते. काठ्या लाठ्यांचे खेळ होतात. मात्र, आम्हाला देशाच्या संरक्षणासाठी एके 47 हवी आहे, असे शिवसेनाप्रमुख म्हणायचे, लाठ्या काठ्यांनी देशाचे संरक्षण होणार नाही, अशी त्यांची भूमिका होती. आज संघाच्या हातात सत्ता आहे. त्यांनी पंतप्रधान आणि अनेक राज्यपाल नेमले आहेत. त्यामुळे त्यांच्या मेळाव्याला सत्तेच तेज आहे. महान राष्ट्रकार्याबाबत त्यांचे नाणे काढण्यात आले आहे. स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे काय राष्ट्रकार्य होते, ते नाणे काढणाऱ्या भाजपने स्पष्ट केले पाहिजे. संघ ही सांस्कृतीक संघटना आहे. त्यांचे हिंदुत्ववादी विचार आहे. त्यांच्याबाबत आम्हाला सहानुभुती एकेकाळी होती. मात्र, राष्ट्र संकटात असते, राष्ट्रविषयी देशहितासाठी सत्ताधाऱ्यांबाबत कठोर भूमिका घ्यायच्या असतात, तेव्हा संघाने त्या भूमिका घेतलेल्या नाहीत, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी अशा प्रमुख नेत्यांचे नाव संघाबरोबर जोडण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, महात्मा गोधी किंवा डॉ. बाबासाहेबांनी कधीही संघांचे समर्थन केले नव्हते. संघ विष आहे, असे बाबासाहेब म्हणायचे. त्याच आंबडकरी विचारांच्या कमलाताई गवई यांना संघाच्या आजच्या मेळाव्यात जबरदस्तीने बोलावून संघ आणि आंबेडकरी विचारांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कमलाताई गवई आणि त्यांचे कुटुंबीय या सापळ्यात सापडले नाहीत, याबाबत त्यांचे अभिनंदन आहे, असेही ते म्हणाले.