काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एकनाथ मिंधे व अजित पवार यांच्या प्रमाणे अशोक चव्हाण सुद्धा आता काँग्रेस वर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय असे सूचक ट्विट केले आहे.
या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी म्हटले आहे की, ” अशोक चव्हाण भाजपवासी झाले. विश्वास बसत नाही. काल पर्यंत ते सोबत होते.. चर्चा करीत होते..आज गेले. एकनाथ मिंधे व अजित पवार यांच्या प्रमाणे चव्हाण सुध्दा आता काँग्रेस वर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय? आणि निवडणूक आयोग त्यांना ते देणार काय? आपल्या देशात काहीही घडू शकते!… असा टोला लगावला आहे.
अशोक चव्हाण भाजपवासी झाले.विश्वास बसत नाही. काल पर्यंत ते सोबत होते.. चर्चा करीत होते..आज गेले.
एकनाथ मिंधे व अजित पवार यांच्या प्रमाणे चव्हाण सुध्दा आता काँग्रेस वर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय?
आणि निवडणूक आयोग त्यांना ते देणार काय?
आपल्या देशात काहीही घडू शकते!… pic.twitter.com/tjX1XzL3Ns— Sanjay Raut (@rautsanjay61) February 12, 2024
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी आणि अजित पवार यांनी राष्ट्रावादी काँग्रेसशी बंडखोरी केली. त्यानंतर त्यांनी पक्षावर दावा केला. आता अशोक चव्हाणांनी राजीनामा दिल्यानंतर हा प्रकार काँग्रेससोबतही घडेल का ? असे सूचक ट्विट संजय राऊत यांनी केले.