दात साफ करताना रुग्णाने गिळले उपकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरीकेत एक वेगळीच घटना समोर आली आहे. एका व्यक्तीला दातांची सफाई करणं चांगलंच महागात पडलं आहे. दात साफ करताना या व्यक्तीने उपकरण गिळले. मात्र लक्षात आल्यावर रुग्णालयात धावावे लागले.

अमेरीकेत एक व्यक्ती दंतवैद्याकडे गेला होता. सीए्नएनच्या माहितीनुसार, अमेरीकेतील इलिनोईस येथील ही घटना आहे. टॉम जोजसी असे त्या रुग्णाचे नाव आहे. तो दंतवैद्याकडे दातांची फिलींग करायला गेला होता. त्यावेळी ड्रिल करत असताना टॉमने चूकून एक इंचाची ड्रिल बीट गिळली आणि एकच गोंधळ उडाला.

WISN12 च्या वृत्तानुसार, टॉमने सांगितले की तो दातांची फिलींग करण्यासाठी गेला होता. मात्र काही सेकंदाने त्याला जाणीव झाली की काहीतरी गिळले. त्याला त्यावेळी एका इंचाची ड्रिल बीट गिळल्याची जाणीवही झाली नाही. पण सारखा खोकला येऊ लागला. सीटीस्कॅन केल्यानंतर कळंल की टॉमने ते उपकरण गिळले नव्हते तर श्वास घेताना ते  आपोआप शरीरात गेले होते. डॉक्टरांच्या माहितीनुसार श्वास घेताना हे उपकरण आत गेले आहे. ते इतके खोल होते की सामन्य स्कॅनमध्ये ते असल्याचे कळलेच नसते.

पलमनोरी तज्ज्ञ डॉ. अब्दुल अलरायस यांनी सांगितले की, ज्यावेळी सीएटी स्कॅन केले त्यावेळी कळले की उपकरण फुफ्फुसाच्या डाव्या बाजूला खाली अडकले आहे. डॉ. अलरायस आणि त्यांच्या टिमने एका नवीन उपकरणाच्या सहाय्याने दुर्लभ वैद्यकिय प्रक्रियेला सामोरे जावे लागेल.