धक्कादायक! अल्पवयीन मुलीचे दुसऱ्यांदा अपहरण करून सामूहीक बलात्कार

हैदराबाद, उन्नावमधल्या बलात्कार आणि जळितकांडाने देश हादरलेला असताना अशा आणकी काही घटना समोर यायला लागल्या आहेत, ज्यामुळे आपण कोणत्या समाजात जगतोय असा प्रश्न पडायला लागला आहे. हरयाणातील पलवलमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहीक बलात्कार करण्यात आला. धक्कादायक बाब ही आहे की याच आरोपींनी काही महिन्यांपूर्वी या मुलीचे अपहरण करून सामूहीक बलात्कार केला होता.

मुलीच्या आईने या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत तिने म्हटलंय की पीडीत मुलगी ही नैसर्गिक विधींसाठी घराबाहेर पडली होती. यावेळी 4 जणांनी तिचे अपहरण केले आणि शेतात जाऊन तिच्यावर बलात्कार केला. या तक्रारीनंतर पोलीस कामाला लागले असून आरोपींच्या शोधासाठी त्यांनी मोहीम सुरू केली आहे. तक्रारीमध्ये पीडितेच्या आईने ऑगस्ट महिन्यातही या मुलीवर याच आरोपींनी अपहरण करून बलात्कार केला होता.

पीडितेच्या आईने तक्रारीत म्हटलंय की 13 ऑगस्टला अल्ताफ, सर्फराज,इर्शाद, शोएब या चौघांनी त्यांच्या मुलीवर बलात्कार केला होता. 4 डिसेंबरच्या रात्री याच चौघांनी नैसर्गिक विधीसाठी घराबाहेर पडलेल्या पीडितेचे पुन्हा अपहरण केले आणि तिच्यावर बलात्कार केला. जवळपास दोन तासांनी या आरोपींनी पीडितेला सोडून दिले असं तिच्या आईने पोलिसांना सांगितलं.

आपली प्रतिक्रिया द्या