संसदेतून खासदारांचे बूट गेले चोरीला

पाकिस्तानच्या संसदेतून खासदार आणि पत्रकारांचे बूट चोरीला गेल्याची घटना शुक्रवारी घडली. खासदार, पत्रकार आणि संसद कर्मचारी संकुलातील मशिदीमध्ये नमाजासाठी गेले होते. जेव्हा ते मशिदीतून बाहेर आले तेव्हा त्यांचे बूट चोरीला गेले होते. चोरटय़ांनी 20 जोडे पळवून नेले. त्यामुळे खासदार अनवाणीच संसदेत परतले.

नमाजच्या वेळी संसदेतील सुरक्षा अधिकारी त्यांच्या जागेवर तैनात नव्हते. त्यामुळे ही घटना घडली. नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष सरदार अयाज सादिक यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.