नागराजच्या ‘झुंड’ चे शूटिंग लवकरच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
त्यानंतर त्यांनी नगर येथील न्यू आर्टस, कॉमर्स आणि सायन्स कॉलेजमधून संज्ञापण विभागातून चित्रपट माध्यमाचे शिक्षण घेतले

सामना ऑनलाईन । मुंबई

‘सैराट’ फेम नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ या पहिल्या हिंदी चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. ‘झुंड’मध्ये सुपरस्टार अमिताभ बच्चन क्रीडा प्रशिक्षक विजय बारसे यांची भूमिका साकारत आहेत. भूषण कुमार आणि सविता राज हिरेमठ यांची संयुक्त निर्मिती असलेला हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे. प्रशिक्षक विजय बारसे यांनी तळागाळात दडलेले फुटबॉलचे टॅलेंट शोधून जगासमोर आणले. त्यांनी नागपूरमध्ये स्लम सॉकर या संस्थेची स्थापना केली. झोपटपट्टीतील मुलांना फुटबॉलचे शिकवण्याचे काम या संस्थेमार्फत केले जाते. ‘झुंड’ हा चित्रपट म्हणजे विजय बारसे यांचा चरित्रपट असल्याची माहिती नागराज मंजुळे यांनी दिली. प्रत्येकामध्ये एक हीरो दडलेला आहे. हा हीरो जगासमोर येण्यासाठी फक्त एका संधीची गरज असते, तेच ‘झुंड’ मधून सांगितले जाईल, असे निर्माता सविता हिरेमठ यांनी सांगितले.