नेमबाजीचे शिबीर पुढे ढकलले, कोरोनाची परिस्थिती पाहून निर्णय घेणार

178

कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यात आलेले अपयश… इतर राज्यांतील खेळाडूंना नवी दिल्लीतील शूटींग रेंजवर येण्यासाठी होणारा त्रास… व महिला प्रशिक्षक कोरोना पॉझीटीव्ह सापडल्यामुळे ऑलिम्पिकशी निगडीत नेमबाजांसाठी आयोजित करण्यात आलेले शिबीर अखेर पुढे ढकलण्यात आले आहे. नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया (एनआरएआय) यांच्याकडून लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱया आठवडयात हे शिबीर सुरू होऊ शकते असे एनआरएआयकडून स्पष्ट करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात कोरोनाची परिस्थिती बघितल्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येईल.

एनआरएआयचे सेक्रेटरी राजीव भाटीया यावेळी म्हणाले, सध्याची परिस्थिती पाहून सराव शिबीर पुढे ढकलण्यात आले आहे. पुढच्या आठवडयात या कॅम्पबाबत अंतिम निर्णय घेऊ. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवडयात हे कॅम्प सुरू होऊ शकते. पण परिस्थिती पाहून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

आतापर्यंत नवी दिल्लीतील
डॉ. कर्णीसिंग शूटींग रेंजवर फक्त दहा खेळाडूच सराव करीत आहेत. यामध्ये नवी दिल्ली, फरीदाबाद व हरयाणा या राज्यांतील खेळाडूंचा समावेश आहे. पण पूर्व व दक्षिण क्षेत्रांतील खेळाडू येणे अद्याप बाकी आहे. टोकियो ऑलिम्पिकसाठी हिंदुस्थानच्या 15 खेळाडूंनी कोटा मिळवला आहे. त्यामुळे या खेळामधून पदक मिळवण्याची संधी अधिक आहे.

आपली प्रतिक्रिया द्या