Shopian Encounter – कश्मीरमध्ये शोपियानच्या जंगलात चकमक, लश्कर-ए-तोयबाच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा

हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीच्या दोन दिवसांनी कश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दलांची दहशतवाद्यांशी चकमक उडाली. या चकमकीत लश्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. ही चकमक अजूनही सुरूच आहे.

शोपियानच्या झिनपाथेर केल्लेर भागात सुरक्षा दलांच्या जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनंतर सुरक्षा दलांकडून राबवण्यात आलेल्या शोध मोहीमेदरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला आणि त्यानंतर चकमक सुरू झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच तीन पैकी एक दहशतवादी स्थानिक असून त्याचे हा शाहिद नाव असल्याची ओळख पटली आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Pahalgam Terrorists- कश्मीरमधील चौकात पहलगाम दहशतवाद्यांचे पोस्टर लावले, माहिती देणाऱ्याला 20 लाखांचे बक्षीस

शोपियानच्या घनदाट जंगलात चकमक सुरू आहे. सुरक्षा दलांच्या जवानांकडून अनेक दहशतवाद्यांना घेरल्याचे सांगण्यात आले होते. सकाळी ही चकमक सुरू झाली. दरम्यान, पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांकडून बक्षीस जाहीर करण्यात आले. जम्मू-कश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचे पोस्टर ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.