विनय आपटे प्रतिष्ठानतर्फे शॉर्ट फिल्म स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 सुप्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते विनय आपटे यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त विनय आपटे प्रतिष्ठानतर्फे मराठी लघु चित्र (शॉर्ट फिल्म ) स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यासाठी 18 ते 25 वर्षे आणि 25 वर्षांवरील अशा दोन गटांत ही स्पर्धा घेण्यात येईल. ‘वेग’, ‘वृद्धाश्रम’, ‘डेटिंग ऍप’ आणि ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (एआय) हे शॉर्ट फिल्मसाठी विषय आहेत.

शॉर्ट फिल्म दहा मिनिटांची असावी. प्रत्येक स्पर्धकाला केवळ एकच प्रवेशिका पाठवता येईल. दोन्ही गटांतील सर्वोत्कृष्ट विजेत्यांना रोख पारितोषिके देण्यात येतील. स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका [email protected] या संकेतस्थळावर 5 नोव्हेंबरपर्यंत पाठवायच्या आहेत. प्रवेश मूल्य 750 रुपये आहे. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे, दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, दिग्दर्शक आणि ज्येष्ठ संकलक राजन वाघदरे, जाहिराततज्ञ भरत दाभोळकर, संकलक भक्ती मायाळू आणि लेखिका रोहिणी निनावे हे आहेत, अशी माहिती विनय आपटे प्रतिष्ठानच्या वैजयंती आपटे यांनी दिली.