
सोने आणि चांदीच्या दरात मंगळवारी पुन्हा वाढ झाली आहे. 24 पॅरेट सोन्याचा भावात 1 हजार 706 रुपयांनी वाढ झाली आहे तर चांदी 2 हजार 695 रुपयांनी महाग झाली आहे. सोने प्रति तोळा 1 लाख 24 हजार 147 रुपयांवर पोहोचले आहे. चांदी प्रति किलो 1 लाख 51 हजार 643 रुपयांवर पोहोचली आहे. सोन्याने ऑक्टोबर महिन्यात प्रति तोळा 1 लाख 30 हजार 900 रुपये दर गाठला होता. परंतु, त्यानंतर सोन्याच्या किंमतीत 8 ते 9 हजारांपर्यंत घसरण झाली होती. मात्र आता सोन्याचा दर पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे.
गुड लक! सीएचएसएल परीक्षा आजपासून
कर्मचारी निवड आयोग (एसएससी) मार्फत घेण्यात येणारी सीएचएसएल परीक्षा उद्या, 12 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. ही परीक्षा 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत चालणार आहे. ही परीक्षा मुंबईसह देशभरातील मोठय़ा शहरांतील पेंद्रांवर घेतली जाणार आहे. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा देशातील 30.73 लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. म्हणजेच एका पदासाठी 981 अर्जदार परीक्षेच्या मैदानात आहेत.
उत्तर प्रदेशातील दोन औषध कंपन्यांवर गुन्हा दाखल
लखनऊ येथील अर्पिक फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि इधिका लाईफसायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड या दोन पंपन्यांविरुद्ध उत्तर प्रदेशातील अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही पंपन्या एकमेकांशी संलग्न म्हणून काम करत होत्या. तसेच बनावट बिलांचा वापर करून बेकायदेशीरपणे कोडीन सिरपची विक्री करत होत्या. यामुळे या दोन्ही पंपन्यांचे परवाने रद्द करण्यात आले. एकाच कुटुंबाच्या मालकीच्या दोन औषध पंपन्या आहेत.
हिंदुस्थान–नेपाळ सीमाप्रश्नी आजपासून बैठक
हिंदुस्थान आणि नेपाळ या दोन देशांमध्ये उद्या 12 नोव्हेंबरपासून दिल्लीत वार्षिक सीमा वार्ता सुरू होणार आहे. ही बैठक तीन दिवसांपर्यंत चालणार आहे. दोन्ही देशांमधील आघाडीच्या सुरक्षा दलांमध्ये हिंदुस्थानचे सशस्त्र सीमा दल आणि नेपाळचे आर्म्ड पोलीस पर्ह्सचे प्रमुख या बैठकीत सहभागी होतील. सप्टेंबरमध्ये काठमांडूमध्ये झालेल्या झेन झेड आंदोलनानंतर दोन्ही देशांची सुरक्षा एजन्सी पहिल्यांदा उच्चस्तरीय बैठकीत सहभागी होत आहे.
राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची मुलगी एकातेरिना चर्चेत
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांची छोटी मुलगी एकातेरिना तिखोनोवा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एकातेरिना ही पुतीन यांची पहिली पत्नी ल्युडमिला यांची मुलगी आहे. तिने सेंट पीटर्सबर्ग स्टेट युनिव्हर्सिटीतून शिक्षण घेतलेले आहे. बुडापेस्टमध्ये ट्रम्प आणि पुतीन यांची बैठक रद्द झाल्यानंतर तिखोनोवा सक्रिय झाली आहे. विदेश मंत्री सार्गेई लावरोव यांच्यात आणि पुतीनमध्ये मतभेद सुरू झाले आहेत. लावरोव यांच्या जागी पुतीन आपल्या मुलीला आणू शकतात, असे बोलले जात आहे. पुतीन आगामी काळात कोणता निर्णय घेतात याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.





























































