
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर करताना अध्यक्षांच्या निवडीसाठी शरद पवार यांनी समितीची घोषणा केली होती. या समिती सदस्यांची शुक्रवारी म्हणजेच 5 एप्रिल रोजी बैठक झाली. यात शरद पवार यांचा राजीनामा फेटाळ्यात आला. त्यानंतर राजीनाम्यासंदर्भात विचार करण्यासाठी पवारांनी वेळ मागितला होता. त्यानंतर आता संध्याकाळी 5 वाजता वाय. बी. चव्हाण सेंटर येथे शरद पवार पत्रकार परिषद घेणार आहेत अशी माहिती देण्यात आली आहे.





























































