आफताबला पूर्ण करायचे आहे उच्च शिक्षण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लिव्ह इन पार्टनर श्रद्धा वालकर हिची क्रूरपणे हत्या केल्याप्रकरणी तिहारच्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या आफताब पूनावाला याने आता सुटकेसाठी पुन्हा न्यायालयात अर्ज केला आहे. याचिकेत त्याने माझ्यावरील आरोप खोटे असून मला या हत्या प्रकरणात गुंतवण्यात आले आहे. मला माझे उच्च शिक्षण पूर्ण करायचे असून त्यासाठी माझी प्रमाणपत्रे, पेन, पेन्सिल आणि वह्या द्याव्यात. त्याचबरोबर पोलिसांनी मला आरोपपत्राची योग्य ती डिजिटल कॉपी द्यावी, अशी मागणीही केली आहे. आफताबवरील खटल्याची पुढील सुनावणी आता 21 फेब्रुवारीला होणार आहे.