
शनिशिंगणापुरात आज तिसरा श्रावणी शनिवार असल्याने भाविकांची अलोट गर्दी झाली. मंदिर परिसरात दर्शनासाठीभक्तांच्या रांगा लागल्या. आज शनिवार असल्याने पहाटेपासून भाविकांच्या ओघ शनी शिंगणापूरकडे येत होता. पहाटे ओल्या वस्त्राने शनी चौथऱ्यावर जाऊन भक्तांनी शनीमुर्तीला तिळाचे तेल तसेच जलाभिषेक करून दर्शन घेतले. यावेळी पहाटचा महाआरतीला मोठ्या प्रमाणात गर्दी होती. आज दिवसभर परिसरातील व जिल्ह्यातील भाविकांनी पायी चालत येऊन शनिशिंगणापूर कडे रस्त्यावर मोठी गर्दी दिसत होती.
शनी मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना महाप्रसाद , साबुदाणा खिचडी व भंडाऱ्याचे वाटप केले . तिसरा श्रावणी पर्वकाळ असल्याने आज मंदिर परिसरात भाविकांच्या गर्दीने अक्षरशः यात्रेचे स्वरूप आले. शिर्डीचे साईबाबा चे दर्शन घेऊन शनिशिंगणापूर येणाऱ्या भाविकांची वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. ठिकठिकाणी वाहतूक कोडीचा सामना करावा लागला. प्रचंड दुष्काळ झळा तसेच उन्हाचा फटका भाविकांना बसल्याने शनी चौथरा जवळ मॅट टाकल्याने भाविकांची उन्हाच्या चटक्यातून सुटका झाली. पेड पास घेऊन हजारो भाविकांनी शनी मूर्तीला स्पर्श करून दर्शन घेतले. अभिषेक भावनातही अभिषेक साठी मोठी गर्दी झाली . दिवसभर गर्दी टिकून राहिल्याने जवळपास दीड ते दोन लाख भाविकांनी शनि दर्शनाचा लाभ घेतला.