श्रावणी सोमवार…भोलेनाथाची पूजा…शिवामूठ…जाणून घ्या माहिती

shiv shankar mahadev

>> योगेश जोशी

आपल्या संस्कृतीत धार्मिक महत्त्व असणाऱ्या श्रावण महिन्याची सुरुवात झाली आहे. यंदा शुक्रवारपासून श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे. श्रावण महिना हा भओलेनाथ शिवशंकराच्या उपासनेसाठी महत्त्वाचा मानला जातो. श्रावणी सोमवारी शिवामूठ वेगळे महत्त्व असते. या शिवामूठबाबत आणि भोलेनाथाची पूजा कशी करावी, पूजा करताना कोणत्या चुका टाळाव्यात, याबाबतची माहिती जाणून घेऊ या.

यंदा पहिला श्रआवणी सोमवार 28 जुलैला येत आहे. या श्रावणी सोमवारी तांदूळ ही शिवामूठ आहे. भगवान शिवशंकर हे भोलेनाथ, आशुतोष, अल्पेश आहेत म्हणजेच त्यांना अल्प प्रमाणात कोणतीही गोष्ट भक्तीभावाने अर्पण केली तर त्यांचा स्वीकार करत ते प्रसन्न होतात आणि भक्तांवर कृपावर्षाव करतात, अशी मान्यता आहे. त्यामुळे श्रावणी सोमवारी जी शिवामूठ असेल त्याचे फक्त एख मूठच शिवशंकरांना अर्पण करण्याची प्रथा आहे.

अशी करावी भोलेनाथांची पूजा –

शिवशंकराच्या पिंडीवर ऊँ नमः शिवाय असा जयघोष करत वाटीभर दूध आणि जल अर्पण करावे.

शंकराला दुग्धाभिषेक आणि जलाभिषेक केल्यावर ऊँ नमः शिवाय बिल्वपत्रे वाहावीत.

सफेद रंगाची कोणतीही फुले किंवा धोत्र्याची फुले शंवशंकराला अर्पण करावीत.

त्यानंतर भोलेनाथांची क्षमा मागत कृपा ठेवण्याचे साकडे घालावे.

भोलेनाथांची पूजा करताना या चुका टाळाव्यात –

भोलेनाथांना बिल्वपत्रे अर्पण करताना ती तीन पानांची असावीत.

बिल्वपत्रे फाटकी, तुटकी किंवा सुकलेली नसावीत.

तीन पाने असलेली देठासकट असलेली बिल्वपत्रे शंकराच्या पिंडीवर वाहावीत

शंकराच्या पिंडीवर तुळशीची पाने आणि कुंकू कधीही अर्पण करू नये, या गोष्टी शंकराच्या पूजेत व्यर्ज्य मानल्या जातात.

पूजा झाल्यावर श्री शिवशंकराला पूर्ण प्रदक्षिणा कधीही घालू नये

शंकराच्या पिंडीभोवती शक्तीपीठ म्हणजेच देवी पार्वतीचे प्रतीक म्हणून शक्तीपीठ असते, त्यामुळे शंकराला पूर्ण प्रदक्षिणा करण्याऐवजी अर्धी प्रदक्षिणा करतात.